Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिमग्याच्या उत्सवावर आणि पालखीच्या सणावर कोरोनाचं सावट

शिमग्याच्या उत्सवावर आणि पालखीच्या सणावर कोरोनाचं सावट
, शुक्रवार, 12 मार्च 2021 (11:02 IST)
कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील शिमग्याच्या उत्सवावर आणि पालखीच्या सणावर कोरोनाचं सावट आलं आहे. कोकणात जायला निघाल्या चाकरमान्यांनी गावाला जाण्याआधी कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोनामुळे चाकरमन्यांनी कोकणात येऊ नये, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. त्यानंतरही शिमग्याच्या सणाला येणाऱ्या चाकरमान्यांनी दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे. 
 
'हे' नियम पाळणे बंधनकारक 
कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. 
जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास आधीचा कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे.
 
पालखी उत्सवावर निर्बंध
यंदा पालखीचा उत्सव अतिशय साधेपणाने होणार आहे. गपणती पाठोपाठ आता होळीच्या सणावरही कोरोनाचं सावट पसरलं आहे. गणेशोत्सव आणि होळी हे कोकणातील दोन मोठे उत्सव. होळीच्या काळात कोकणातील गावांमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या निघतात. त्यासाठी शहरातील लोक मोठ्याप्रमाणावर कोकणातील आपल्या गावी जातात.
 
यंदाही होळीच्या काळात कोकणात अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच पालखी घरोघरी नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच गावागावांत ग्रामदेवतेच्या पालख्या रात्री नाचवल्या जातात. तसेच गावात नमन-खेळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.त्यावर बंदी आणली आहे. कोकणात येणाऱ्या गावकऱ्यांचे गावातही स्कॅनिंग केले जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्मार्ट सिटी सायबर हल्लाप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी