कोपर्डी खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. यामध्ये आतापर्यंत 31 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रथम युक्तिवाद करतील. त्यांनंतर मुख्य आरोपीसह तीनही आरोपींचे वकील युक्तिवाद करतील. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत अंतिम युक्तिवाद होऊन डिसेंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे.
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.