Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बारामतीत कोयता गँगचा धुमाकूळ

pitai
रविवार, 18 डिसेंबर 2022 (12:48 IST)
बारामतीत कोयत्याचा धाक दाखवत कोयता गँगने धिंगाणा करत अनेक ठिकाणी तोडफोड केली. मद्यधुंद अवस्थेत हॉटेलच्या काचा फोडून हॉटेलचे नुकसान केल्याचे वृत्त आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,चार ते पाच जण शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरात रेल्वे गेट जवळ या गॅंग ने मद्यधुंद अवस्थेत हातात कोयता घेत आले आणि त्यांनी पाचाहून अधिक हॉटेलात जाऊन तोडफोड करत हॉटेलच्या काचा फोडल्या आणि चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान केले. एकाचा मोबाईल हिसकावला.दुकानाची तोडफोड केली.नंतर एका पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकल्यावर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने पैसे मागितल्यावर कोयत्याने हल्ला केला. शहरातील नागरिकांमध्ये या कोयता गॅंगमुळे दहशतीचं वातावरण आहे.

कोयता गँगच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहे. या गँगने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासमोर एका दुकानात आणि हॉटेलात शिरकाव करून दुकानाची तोडफोड करत नासधूस केली. एकावर कोयत्याने वार केल्यामुळे त्याचा हाताला दुखापत झाली आहे. दुचाकीवरून हे कोयता गॅंग कोयताचा धाक दाखवत गावात धुडघूस घातल्याचे लोकांनी सांगितले.या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ दोन युवकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून कसून विचारपूस करत आहे.
 
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gram Panchayat Election 2022 : राज्यात आज सात हजाराहून अधिक ग्राम पंचायतीसाठी मतदान