लासलगाव बाजार समिती मध्ये शेतकर्यांनी शेती माल विक्री केल्यानंतर त्यांना मिळालेल्या धनादेशासाठी चेक
कीलअरींग सिस्टीम सुरु करण्याबाबत बुधवारी बाजार समिती बंद आहे . भारत सरकाराने दि.८ पासुन चलनातू 500 व् हजार चे नोटा रद्द केल्यामुळे बाजार समिती मध्ये व्यापाऱ्यांना व शेतकार्यना अडचणी निर्माण झलेल्या आहे तसेच नासिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या चलन अभावी बंद पडल्या आहे.या परिस्थिती मध्ये शेतकार्यांना शेती माल विक्रीसाठी व चलन मिळण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे . यामुळे बळीराजाला मोठ्या प्रमाणत आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे . बाजार समितीत रोज लाखोंची उडढाल होत असल्यामुळे या करता मोठी रक्कम पाहिजे रोज लाखो टन कांदा बाहेर जातो पैसे उपलब्ध नसल्या मुळे शेतकर्यांना सध्या पैसे देता येत नाही व बँक कडून जास्त चेक बुक उपलब्ध होत नसल्याने बुधवारी एका दिवसा साठी बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे .व्यापारी वर्गा कडून बंद ठेवण्यात आले आहे.या वेळी बाजार समिती कडून शेतकर्यांचे अडीअडचणी जाणून घेणार आहे.