Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटी चालकाची बसमध्येच बॅगच्या बेल्टने गळफास लावून आत्महत्या

एसटी चालकाची बसमध्येच बॅगच्या बेल्टने गळफास लावून आत्महत्या
लातूर , बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (10:35 IST)
लातुर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात  एसटी बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संजय केसगिरे असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.
 
उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना एसटी बस चालक संजय केसगिरे यांनी स्वतःकडील बॅगचा बेल्ट काढून त्याच्या सहाय्याने गळफास घेतला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाल. पण अद्याप आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकले नाही. या घटनेने उदगीर आगारातील कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू-काश्मिरमध्ये 3 दहशतवादी हल्ले