लावणी डान्सर गौतमी पाटील हिच्या अहमदनगरच्या कार्यक्रमात तुफान राडा झाला. कार्यक्रमात हुल्लडबाजी कारण्याऱ्यांसाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे प्रेक्षकांची धावपळ झाली. या गोंधळामुळे आयोजकांनां कार्यक्रम बंद करावा लागला.
अहमदनगर जिल्ह्यात राहाता येथे लावणी डान्सर गौतमी पाटील हिचा डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुणांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रम सुरु असताना काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशांची उधळण केली. गौतमीने मध्येच कार्यक्रम थांबवून प्रेक्षकांना कार्यक्रमात गोंधळ न करण्याची विनवणी केली. कार्यक्रम मध्येच थांबवल्यामुळे प्रेक्षकांनी राडा करायला सुरुवात केली. पोलिसांना गर्दी शांत करण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.