Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिन्नर तालुक्यात शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

leopard
, सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (15:26 IST)
तालुक्यातील पाथरी या गावी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा शेतकरी  जखमी झाला आहे. त्याला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, सिन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची दहशत कायम आहे.
 
नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, निफाड या काही तालुक्यांमध्ये मागील काही दिवसापासून बिबट्याने सातत्याने हल्ले केल्याच्या घटना या घडतच आहेत. आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती.
 
त्या पाठोपाठ संध्याकाळी सिन्नर तालुक्यातील पाथरे या गावी शेतामध्ये काम करत असलेल्या हरी साहेबराव नारोडे (वय ३२) या शेतकऱ्यावर शेतामध्ये काम करत असताना संध्याकाळच्या वेळेस बिबट्याने अचानक हल्ला केला.
 
हरी नरोडे यांच्यावर हल्ला केल्यानंतर आजूबाजूच्या शेतामध्ये काम करत असलेले शेतकरी हे मदतीसाठी धावून आले त्यामुळे बिबट्या पळून गेला. परंतु या हल्ल्यामध्ये हरी नरोडे हे जखमी झाले. त्यांना तातडीने सिन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्या मानेवर व शरीराच्या इतर भागांमध्ये जखमा झाल्या. त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने येथील वनसंरक्षक मनिषा जाधव व अन्य वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या ठिकाणी नागरिकांना दिलासा देण्याचा काम करण्याबरोबरच आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिंदे सरकारकडून एसटी महामंडळाच्या निधीला कात्री