Leopard in the house of Indorikar Maharaj प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं संगमनेर तालुक्यातील ओझर गावात घर असून या घरात चक्क बिबट्या घुसला असल्याचे समोर आले आहे. या बिबट्याने तिथे झोपलेलं एक कुत्रं देखील उचलून नेलं आहे. तिथे अचानक बिबट्या येतो, त्यापैकी एका कुत्र्यावर तो हल्ला करतो आणि त्याला आपल्या सोबत घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढतो. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या किर्तनाची शैली सर्वांनाच भुरळ घालते. त्यांच्या किर्तनाला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आता पुन्हा घरात बिबट्यामुळे ते एकदा परत चर्चेत आले आहेत.