Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची ‘लाईव्ह’ सुनावणी

court
, बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (15:21 IST)
घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे. सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर होणार आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे. ‘बार अँड बेंच’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
 
घटनापीठासमोरील या खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा निर्णय सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘फूल कोर्ट मीटिंग’मध्ये घेण्यात आला.सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीवेळी लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. त्यावेळी ते नॅशनल इन्फॉर्मेटिंक्स सेंटर या सरकारी संस्थेच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आलं होतं.
 
याशिवाय सर्वोच्च न्यायालयात कामांच्या दिवशी नियमीत प्रकरणाच्या सुनावणी दुपारी १०.३० ते १ दरम्यान घेण्यात येत आहेत. तर अन्य दिवशी दुपारी २ ते ४ या वेळात इतर प्रकरणांच्या सुनावणी घेण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रायपूर विमानतळावर मुलींची गुंडगिरी, पगार मागितल्याने चालकाला बेल्टने बेदम मारहाण, शिवीगाळ