Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CCTV मध्ये कैद झाली Live Suicide: वडील आणि मुलाने रेल्वेच्या खाली स्वतःला झोकवून देत केली आत्महत्या

social media viral
, बुधवार, 10 जुलै 2024 (11:25 IST)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये भाईंदर स्टेशन जवळ एक भयंकर घटना पाहवयास मिळाली. एक 60 वर्षीय वडील आणि त्यांच्या मुलाने येणाऱ्या लोकल समोर स्वतःला झोकावून देत आत्महत्या केली आहे. 
 
ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजता घडली आहे. वडील आणि मुलाची ओळख 60 वर्षीय हरीश मेहता आणि त्यांचा 35 वर्षीय मुलगा  जय या रूपात झाली आहे. ते वसईमध्ये राहत होते. सीसीटीवी फुटेज मध्ये पाहण्यास मिळाले की, लोकल येताच दोघांनी एकमेकांचा हात धरला आणि रुळावर झोपले.

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. त्यांनी आत्महत्या का केली यामागील कारण अजून समजले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशी सुरु केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये आज कोसळणार पाऊस, विदर्भ, मराठवाडासाठी येलो अलर्ट घोषित