Publish Date: Mon, 21 Nov 2016 (10:26 IST)
Updated Date: Mon, 21 Nov 2016 (10:29 IST)
मुंबईतल्या ट्रेनमधली मारामारी काही नविन नाही. यावेळी मात्र लोकलमध्ये दरवाजावर उभे राहण्यावरुन महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यात तीन महिलांनी एका महिलेला मारहाण करत तिच्या हाताला चावाही घेतला. यात प्रभा प्रभुदेवा नालासोपारा स्टेशनवरुन सकाळी 7.31च्या चर्चगेट लोकलमध्ये चढली. यावेळी ही मारामारी झाली. पुढे तिन्ही महिलांना भाईंदर स्टेशनवर उतरवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर प्रभा प्रभुदेवा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.