Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉग मार्च यशस्वी, मात्र अंमलबजावणी सुरु होईपर्यत माघार नाही, नेते जे.पी गावित यांची माहिती

लॉग मार्च यशस्वी, मात्र अंमलबजावणी सुरु होईपर्यत माघार नाही, नेते जे.पी गावित यांची माहिती
, गुरूवार, 16 मार्च 2023 (21:24 IST)
नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातून निघालेले लाल वादळ अर्थात शेतकरी, आदिवासी यांचा लॉग मार्च यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. मात्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला. काही मागण्या या विचारधीन आहेत. त्यावर जोपर्यंत सरकार त अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार अशी माहिती आंदोलनकर्त्यांचे नेते जे.पी गावित यांनी दिली आहे.
 
याआधी शेतकऱ्याच्या १२ जणांच्या शिष्ठ मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुमारे दोन ते तीन तास बैठक चालली. त्यानंतर याबाबत गावित यांनी माहिती दिली. यात जोपर्यंत मागण्यांवर अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मोर्चातून माघार घेणार नाही. मागील मोर्चाचा आम्हाला अनुभव आहे, आश्वासन दिले जाते. मात्र अंमलबजावणी केली जात नाही. यावेळी आश्वासनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार नाही. अधिवेशन होईपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिली आहे, असे गावित यांनी सांगितले. दरम्यान शेतकऱ्यांचा मोर्चा वाशिंद येथे थांबणार आहे. मात्र सरकारकडून आश्वासनांची अंमलबजावणी सुरु झाल्यांनतर मोर्चा मागे फिरणार आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, विजेच्या तारांनी घेतला जीव, तारा ट्रकवर पडल्याने दोघांचा मृत्यू