Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित दादा राज यांच्या भेटीला जवळपास दीड तास चर्चा

अजित दादा राज यांच्या भेटीला जवळपास दीड तास चर्चा
, गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (10:06 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असून, जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे. दादरमध्ये दोघांच्या एका मित्राच्या घरी बैठक झाली असल्याचे वृत्त वृत्त एका मराठी दिले आहे. मनसे अध्यक्ष राज राज ठाकरे यांनी महाआघाडीत यायला हवे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यानंतर आज अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून, भेटीमुळे राजकीय चर्चां जोरदार सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार हे पूर्वी शिवसेना आणि मनसेच्या विरोधात भूमिका घेत होते. मात्र आता त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांनी आघाडीसोबत यावे, असे मत व्यक्त केले आहे. “राज ठाकरे यांनी २०१४ साली नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. मात्र आज ते मोदींबद्दल काय बोलतात, हे सर्वांनाच ठावूक आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला देखील हजेरी लावली होती. राज ठाकरेंची भूमिका आता बदलली असून, मनसेसोबत ठराविक मतांचा पाठिंबा नक्कीच आहे. त्यामुळे ते आघाडीत असतील तर फायदाच होईल”, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. या दोघांच्या भेटीने राजकीय वातवरण तापून निघाले आहे. तर तिकडे शिवसेना आणि भाजपा युती होण्याच्या मार्गावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक पाचगणीत पॅराग्लायडिंग करत असताना पर्यटकाचा मृत्यू