Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळग्रस्त जनता पाणी, चारा, काम व मदतीपासून वंचित

निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळग्रस्त जनता पाणी, चारा, काम व मदतीपासून वंचित
लोकसभा निवडणुकीच्या नावावर अधिकारी कर्मचारी दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व शेत मजुरांना पिण्याचे पानी, गुरांना चारा, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, रोजगार व नवीन पिककर्ज इत्यादी मदत व रोजगार हमीची कामे नीवडणुकीचे काम समोर करून उपल्बध करून देण्यास टाळाटाळ करीत असुन या विषयीच्या प्रचंड तक्रारी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व शेतमजूर करीत असुन अधिकारी व कर्मचारी आदर्श आचारसंहितेचा नावावर लोकप्रतिनिधींचे एकात नसल्यामुळे उच्चं न्यायालयाच्या निर्णयानंत मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर निवडणूक आयोग रोखु शकत नसल्याने कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना चर्चा दुष्काळापेक्षा निवडणूक महत्वाची असल्यास दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पुढे ठकळण्याची मागणी केली आहे, जर दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकरी व शेत मजुरांचे पाणी व चारा तसेच मजुरीसाठी हाल होत असल्याच्या तक्रारी येत असल्यास आपण उच्चं न्यायालयात धाव घेणार असल्याची माहीतीही किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 
 
यापुर्वी मदत व पुनर्वसनाच्या कामाना आदर्श आचारसंहितेचा नावावर का रोखत आहात अशी विचारणा केल्यावर मस्तवाल कामचोर अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे कारण समोर केल्यामुळे किशोर तिवारी यांनी हा वाद निवडणूक आयोगापुढे नेल्यानतंर निणर्य झालेले सर्व  मदत व पुनर्वसनाच्या कामाना व पाणी ,चारा ,रोजगार हमी योजनेची कामे  आचारसंहितेचा नावावर रोखणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे द्यावी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येणार असल्याची माहीती दिली होती मात्र आजपर्यंत कोणालाही निवडणूक आयुक्तांनी निर्देश दिले   नसल्याचे किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॅडमिंटन स्टार ली चोंग वेईने मलेशिया ओपनमधून नाव मागे घेतले