कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता थेट महाराष्ट्र सरकार Paytm सारखे सरकारी ‘महा वॉलेट’ नावाचे ई-वॉलेट आणत आहे. देशात अशाप्रकारचे महावॉलेट हे देशातील पहिलेच सरकारी ई वॉलेट ठरणार आहे. अदयाप देशात अशाप्रकारचे सरकारी ई वॉलेट कोणत्याही सरकारने आणलेले नाही. त्यामुळे हे देशातील पहिलेच सरकारी ई वॉलेट ठरणार आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड यासारख्या कार्डच्या माध्यमातून पेमेंट करता येईल.