डॉ. हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन हे बंधूंच्या फोर्स मोटर्स प्रायोजित 'गोल्डन क्वाड्रीलेटरल ऑफ इंडिया’ या देशासाठी समर्पित या मोहिमेला गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून उत्साहात सुरुवात झाली. भारतीय नागरिकांना नियम पाळण्याविषयीचे प्रबोधन या मोहिमेत करण्यात येणार असून इंग्रजी आणि हिंदी भाषेत १६००० हून अधिक पत्रके छापण्यात आली आहेत.
फोर्स मोटर्सचे चेअरमन अभयजी फिरोदिया, झी २४ तास चे कार्यकारी संपादक उदयजी निरगुडकर, कॅबिनेट मंत्री एकनाथजी शिडे, नाशिक सायकलीस्टचे जसपाल सिंघ विर्दी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी हितेंद्र महाजन यांनी मदत केलेल्यांचे सर्वांचे आभार मानले आणि मोहीम संपेपर्यंत सदिच्छांचा सोबत राहू देण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला येणे शक्य झाले नसले तरी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाजन बंधूंच्या मोहिमेची माहिती लोकांना दिली व त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
सुरुवातीची ३० किलोमीटर्सचे अंतर महाजन बंधूंनी सोबत कापले. व नंतर महेंद्र महाजन विश्रांतीसाठी युटीलिटी वाहनात विश्रांती घेण्यासाठी थांबले. पहिल्या दिवसाच्या प्रवासात बेळगाव पर्यंत पोचण्याचे ठरविण्यात आले असून दुसऱ्या दिवशीच्या रात्री बेंगळूरू गाठण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, प्रत्येक मोठ्या शहरात प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून पत्रकारांशीही संवाद शाध्ण्यात येणार आहे.