Publish Date: Wed, 30 May 2018 (09:37 IST)Updated Date: Wed, 30 May 2018 (09:39 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आज 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वा जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahresult.nic.in वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल. बोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.
विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल.ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल.