जळगाव: जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याजवळ पपईची वाहतूक करणारा ट्रक पलटला. या अपघातात 16 मजूर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावलजवळ असलेल्या किनगाव येथील मनुदेवी मंदिर परिसरात ही घटना घडली. येथे पपईने भरलेला ट्रक उलटला. ट्रक आणि पपईच्या ढिगाराखाली दबून 16 मजुरांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, यात एकाच कुटुंबातील 10 सदस्यांचा समावेश आहे.
धुळ्यातून हा ट्रक रावेरला चालला होता. किनगाव येथे अचानक चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रक उलटल्यामुळे मागे बसलेले मजूर दबून मेल्याची बातमी आहे. सर्व मजूर झोपलेले होते, त्यामुळे काही कळण्याच्या आताच सर्व काही संपले.
नेमका हा अपघात कसा घडला याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.