Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेत अजित पवार सहभागी झाले नाहीत

LIVE: Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi:  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेत अजित पवार सहभागी झाले नाहीत
, शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 (11:00 IST)
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

12:36 PM, 15th Nov
महाराष्ट्र निवडणुकीत नागपुरात 'डॉली चायवाला'ची एन्ट्री

12:17 PM, 15th Nov
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेत अजित पवार सहभागी झाले नाहीत
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतली, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी या सभेत हजेरी लवली नाही.

11:40 AM, 15th Nov
हे अदानींचे सरकार आहे, म्हणत राहुल गांधींचा नांदेड़ मध्ये भाजपवर हल्लाबोल
सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पक्ष आणि विपक्ष एकमेकांवर शाब्दिक वार करत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे खासदार राहुल गाँधी यांनी नांदेड़ मध्ये एक सभा घेतली आणि या रॅलीला संबोधित करताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला

11:02 AM, 15th Nov
बंटेंगे तो कटेंगे घोषणे वर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रया
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची बंटेंगे तो कटेंगे घोषणा प्रचंड गाजली आहे.ही घोषणा सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

09:36 AM, 15th Nov
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला 3,000 रुपये देणार -काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये दिले जातीलअसे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी दिले.इगतपुरी येथील सभेला संबोधित करताना खरगे म्हणाले,

09:12 AM, 15th Nov
भडकाऊ भाषण देऊन ओवेसी अडकले; पोलिसांनी पाठवली नोटीस, काय आहे गुन्हा?
Asaduddin Owaisi News : AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी कायदेशीर अडचणीत अडकले आहेत. रॅलीच्या मध्यभागी स्टेजवर येऊन पोलिसांनी त्यांना नोटीस दिली, ज्यात त्यांना कडक सूचना देण्यात आल्या होत्या.

08:15 AM, 15th Nov
विदर्भात 62 पैकी 36 जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत
महाराष्ट्रातील विदर्भात विरोधी आघाडीची महाविकास आघाडी (MVA) लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी सत्ताधारी महायुती विशेषत: भाजप 2014 सारखे यश मिळविण्यासाठी धडपडत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बंटेंगे तो कटेंगे घोषणे वर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रया