Maharashtra Auto/Taxi Strike: महाराष्ट्रातील कोकण विभागातील अडीच लाखांहून अधिक ऑटो (तीन चाकी) आणि टॅक्सी चालकांनी 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. ऑटो आणि टॅक्सी चालकांनी त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्राच्या कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.
कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी फेडरेशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर म्हणाले, ""राज्य सरकारने ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे बेमुदत संपावर जाण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.
ते म्हणाले की, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांची प्रमुख मागणी म्हणजे भाडेवाढ. सीएनजीचे दर वाढले आहेत, त्यामुळे ते आवश्यक आहे.