Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात मुलींच्या जन्मदरात घट

महाराष्ट्रात मुलींच्या जन्मदरात घट
महाराष्ट्रात मुलींच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. 2016 मध्ये तब्बल आठ टक्क्यांनी जन्मदर घसरला असून या वर्षी हजार मुलांमागे 899 मुली असलेल्या आकडा समोर आले आहे जेव्हा की 2015 मध्ये हा आकडा 907 होता.
राज्य आरोग्य विभागाकडून हा अहवाल जारी करण्यात आला असून स्त्री-पुरुष जन्मदरात घसरण होणार्‍या राज्यांमध्ये वाशिम पहिल्या क्रमांकावर असून 62 टक्क्यांनी खाली आला आहे. तर यानंतर पुणे आणि उस्मानाबादचा क्रमांक आहे जिथे 53 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. पुण्यात हजार मुलांमागे 838 चा आकडा बघायला मिळत आहे. तर मुंबईतील आकडा खूप चांगला नसला तरी परिस्थिती जरा बरी आहे. येथे जन्मदर हजार मुलांमागे 936 मुलींचा आहे तसे हजार मुलांमागे 951 मुली असणे योग्य आकडा मानला जातो.
 
तसेच जन्मदरात वाढ झाल्याचे आकडा बघायला गेलो तर भंडारा येथे जन्मदरात 78 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर यानंतर परभणी आणि लातूरचा क्रमांक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअॅपवर मेसेज एडिट अथवा डिलीटही करता येणार