महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहे. महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्याबाबत महाराष्ट्रात सुरू असलेला सस्पेन्स आता संपणार आहे. तसेच आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....