Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Live News Today in Marathi बुधवार 13 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Maharashtra Live News Today in Marathi बुधवार 13 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी
, बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (09:25 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

11:47 AM, 13th Nov
खलिस्तानी दहशतवाद्याच्या धमकीनंतर राम मंदिराची सुरक्षा वाढली
Ayodhya News : कॅनडास्थित खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नू यांनी हल्ल्याची धमकी देणारा व्हिडिओ जारी केल्यानंतर मंगळवारी सकाळी अयोध्येतील राम मंदिराभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली
 

11:46 AM, 13th Nov
गोंदियामध्ये राहुल गांधी यांनी संविधानाबाबत भाजपवर टीकास्त्र सोडले

11:45 AM, 13th Nov
झारखंड निवडणूक: 43 विधानसभा जागांवर मतदान सुरु
रांची- झारखंडमध्ये विधानसभेच्या 43 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत सुमारे 13.04 टक्के मतदान झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, ती सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
 

11:44 AM, 13th Nov
महायुतीने मुंबई राहण्यायोग्य केली-अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईमध्ये मुंबईबद्दल मोठे वक्तव्य केले. राज्यातील महायुती सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने मुंबई राहण्यायोग्य केली आहे.

10:27 AM, 13th Nov
अचलपूरमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसला योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
गेल्या तीन दिवसांपासून मी खरगे यांचे म्हणणे ऐकत आहे. मी योगी आहे आणि माझ्यासाठी राष्ट्र सर्वोच्च आहे. तुमच्यासाठी काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण सर्वोच्च आहे. काँग्रेसचे तुष्टीकरण धोरण तुमच्यासाठी पहिले आहे, त्यामुळेच तुम्हाला खरे बोलता येत नाही, असा टोला योगिनीं खरगेंना लगावला. 

10:26 AM, 13th Nov
सत्तेसाठी भाजपने ठाकरे आणि पवारांचे कुटुंब तोडले-खासदार प्रमोद तिवारी

09:31 AM, 13th Nov
लातूरमध्ये हेलिकॉप्टरची तपासणी,नितीन गडकरींवर निवडणूक आयोगाची कारवाई

09:30 AM, 13th Nov
महाविकास आघाडीच्या बोलण्यात येऊ नका, अकोल्यात म्हणाले योगी आदित्यनाथ
भगवान राम आणि कृष्ण अस्तित्वात नाही असे काँग्रेस म्हणते.  या निवडणुकीत अशा काँग्रेसचे अस्तित्वच संपवू, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. 

09:29 AM, 13th Nov
मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला रोखून देशद्रोही म्हणण्याचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शिवसेना तोडण्यासाठी आणि भाजपला सत्तेसाठी पाठिंबा दिल्याबद्दल एक तरुण त्यांना 'देशद्रोही' म्हणतांना आढळला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला रोखून देशद्रोही म्हणण्याचा व्हिडिओ व्हायरल