Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LIVE: रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार,

Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2024 (20:15 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमव्हीएमच्या दारूण पराभवानंतर मंथन सुरू झाले आहे. एकीकडे एमव्हीएमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. दुसरीकडे, सपा नेते अबू आझमी यांनीही एमव्हीएशी संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, काँग्रेस आता निवडणुकीतील पराभवावर चिंतन करणार आहे.
 
. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्री पोलीस स्टेशनजवळ भरधाव वेगामुळे दोन दुचाकीस्वार तरुणांचा अपघात झाला. पण, दोघांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. सविस्तर वाचा 
 

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरला होणार आहे. नागपुरात होणाऱ्या समारंभात नवे मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, जवळपास 30 मंत्री शपथ घेणार आहे. सविस्तर वाचा 

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर घर आणि बंगल्यांचे वाटप सुरू झाले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस रामगिरी बंगल्यात राहणार आहेत. या बंगल्यात यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राहत होते.

महाराष्ट्रात कोणत्या आमदाराला मंत्री करायचे आणि कोणाला कोणते खाते द्यायचे हे देवेंद्र फडणवीस स्वतः ठरवतील. भाजप हायकमांडने हे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे सोपवले आहे.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नागपुरातील राजभवनात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरच्या इतिहासात राज्य मंत्रिमंडळाची शपथ घेण्याची ही दुसरी वेळ आहे. हिवाळी अधिवेशनही 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. सविस्तर वाचा 

महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे पोलिसांनी नायजेरिया आणि केनियासह विविध आफ्रिकन देशांतील 13 नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून 12 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. सविस्तर वाचा 
 

माजी केंद्रीय कृषिमंत्र्यांना त्यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माझा मुलगा रोहित, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ हे सर्वजण जमले होते, असे सुनंदा पवार यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा 

नागपूर विमानतळावर फटाक्यांनी भरलेले पार्सल लोड होण्यापूर्वी जप्त करण्यात आले आहे. सविस्तर वाचा 

विमानांना उशीर झाल्यामुळे इंडिगो एअरलाइन्सचे शेकडो प्रवासी इस्तंबूल विमानतळावर अडकले. तसेच या गैरसोयीबद्दल विमान कंपनीने खेद व्यक्त केला आहे. प्रभावित फ्लाइट्सची नेमकी माहिती त्वरित कळू शकली नसली तरी, अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर 24 तासांचा विलंब आणि विमानतळावर सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी केल्या. सविस्तर वाचा

शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की, बांगलादेशात हिंसक हल्ल्यांचा सामना करत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने काय पाऊल उचलले आहे? मुंबईत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आणि ते म्हणाले की, त्यांचे हिंदुत्व केवळ मते गोळा करण्यासाठी आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. पण  अजून  मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यावर महाविकास आघाडी सातत्याने महायुतीवर टीकास्त्र सोडत आहे. सविस्तर वाचा

भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे विस्तार 15 डिसेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी मंत्र्यांचा शपथविधीही होणार आहे. सविस्तर वाचा ...

ऑगस्ट महिन्यात दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि पुतळ्याची हानी झाली.  आता या प्रतिमेचे पुनर्बांधणीचे काम सुरु होणार असून त्यासाठी कंत्राट ही देण्यात आले आहे. 
सविस्तर वाचा ... 

मुंबईतील विक्रोळीजवळ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाइलिंग क्रेन घसरून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पायलिंग क्रेन अंगावर पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वाचा ... 

मुंबईत कुर्ला बस अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला.या अपघातानंतर कुर्ला बेस्ट महापालिकेने कडक कारवाई करत स्थानका जवळील 150 मीटर पर्यंतच्या फेरीवाल्याना परिसरातून हटवण्यात आले आहे.

मुंबईत कुर्ला बस अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला.या अपघातानंतर कुर्ला बेस्ट महापालिकेने कडक कारवाई करत स्थानका जवळील 150 मीटर पर्यंतच्या फेरीवाल्याना परिसरातून हटवण्यात आले आहे. 
सविस्तर वाचा ...

मुंबईतील दादर स्थानकावरील हनुमान मंदिर पाडण्याच्या आदेशाला रेल्वेने स्थगिती दिली. आदित्य ठाकरे शनिवारी या मंदिरात जाऊन पूजा करणार होते.

पुण्यातील एका सोफाच्या कारखान्यात भीषण आग लागली असून या आगीत एक कर्मचारी जिवंत होरपळला आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर  नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पराभवानंतर काँग्रेस मध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानापटोले यांनी राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 
सविस्तर वाचा ...

ऐतिहासिक कोरेगाव भीमा लढाईच्या 207 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जानेवारी 2025 रोजी कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. 
सविस्तर वाचा ... 
 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना अलीकडेच भारतातील टॉप 4 राज्यांची नावे दिली जिथे रस्ते अपघात सर्वाधिक होतात.
सविस्तर वाचा ... 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमव्हीएमच्या दारूण पराभवानंतर मंथन सुरू झाले आहे. एकीकडे एमव्हीएमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. दुसरीकडे, सपा नेते अबू आझमी यांनीही एमव्हीएशी संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, काँग्रेस आता निवडणुकीतील पराभवावर चिंतन करणार आहे.
सविस्तर वाचा .... 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

एका पोलीस कर्मचाऱ्याने 60 पुऱ्या खाऊन नवा विक्रम केला

धुळ्यात धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून 51 लाखांची फसवणूक, 6 जणांवर गुन्हा दाखल

Secular Civil Code लागू करेल मोदी सरकार, पंतप्रधानांनी लोकसभेत घोषणा केली

LIVE: रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार,

रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार, महाराष्ट्राच्या पराभवावर काँग्रेस मंथन करणार

पुढील लेख
Show comments