जितेंद्र आव्हाड सभागृहात म्हणाले, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप होता, खुनाचा गुन्हा का नाही? वाल्मिक कराड हे सरकारपेक्षा मोठे आहेत का? बीड, परभणीच्या प्रश्नावर आम्हाला बोलू दिले जात नाही. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहोत. तसेच पुढील आठवड्यात बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली.