Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार

LIVE:30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार
, सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (19:03 IST)
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर 26 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन होणार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट न लागू करता सरकार स्थापन व्हावे, अशी भाजप हायकमांडची इच्छा आहे. तसेच त्यासाठी आज 25 नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा निश्चित करण्यासोबतच नव्या मुख्यमंत्र्यांनाही शपथ घ्यावी लागणार आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊ शकतात. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकजण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतो.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाला सर्व 57 नवनिर्वाचित आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल शिंदे यांचे कौतुक करण्यात आले. सविस्तर वाचा 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरात लवकर 'समान नागरी कायदा' आणण्याची विनंती करतो आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रणावरही कायदा आणावा. असे देखील ते म्हणाले. सविस्तर वाचा 
 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड शहरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. तसेच दोन्ही नेत्यांमधील बैठकीचे ठिकाण आणि चर्चेबाबत कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही. सविस्तर वाचा 

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत NCP SP पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच यानंतर पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांनी आपला पराभव स्वीकारला आणि स्वत:वरील अतिआत्मविश्वास हेच आपल्या पराभवाचे कारण असल्याचे सांगितले. सविस्तर वाचा 

आज महाराष्ट्रात फडणवीस, शिंदे आणि अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा करतील आणि संभाव्य मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे. यानंतर, राज्यपाल संध्याकाळपर्यंत एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना शपथ देऊ शकतात. सविस्तर वाचा 
 

हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवावर कंगना राणौत म्हणाल्या की, विरोधकांचा पराभव होईल मला आधीच विश्वास होता. यासोबतच कंगनाने विरोधकांना दानव संबोधत म्हटले की, दानव आणि देव यात फरक कसा करायचा हे सर्वांनाच माहित आहे. सविस्तर वाचा 

पराभवानंतर शिवसेनेचे यूबीटी खासदार संजय राऊत यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. आता संजय राऊत यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा 

किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन हल्लाबोल केला आहे. संसदेत जिहाद आणि इस्लामचा धोका यावर बोलत असताना त्यांना आपले कर्तव्य का आठवले नाही, असा प्रश्न सोमय्या यांनी केला. सविस्तर वाचा 

महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सविस्तर वाचा 
 

राज ठाकरे यांच्या पक्षाला मनसेला विधानसभा निवडणूक मध्ये एक ही जागा मिळाली नाही. माहीम विधानसभा मतदार संघातून अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला आहे. विधानसभेत पराभूत झाल्यामुळे आता निवडणूक आयोग त्यांच्याकडून पक्षाचे निवडणूक चिन्ह परत घेणार आहे. सविस्तर वाचा ..... 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना UBT ने आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मुंबईत विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, त्यात आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. सविस्तर वाचा 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती जिंकली असून आता एक दिवसांनंतर एनसीपीचे नेता शरद पवार यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना युबीटी च्या आमदारांची बैठक झाली या साठी पक्षाचे सर्व निवडून आलेले आमदार उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले असून दोन्ही सभागृहाच्या नेतेपदी आदित्य ठाकरे यांनी एकमताने निवड करण्यात आली.सविस्तर वाचा .....
 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही बाब मला प्रसारमाध्यमांकडून समजली.सविस्तर वाचा ......

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना UBT यांनी आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, सुनील प्रभू बनले मुख्य व्हीप