Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळात फेरबदलासह खातेवाटप जाहीर, अर्थ खातं अजित पवारांकडेच

Maharashtra Cabinet Expansion :  राज्य मंत्रिमंडळात फेरबदलासह खातेवाटप जाहीर, अर्थ खातं अजित पवारांकडेच
, शुक्रवार, 14 जुलै 2023 (16:59 IST)
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शिंदे- फडणवीस सरकार मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नव्हता.या साठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकी सुरु होत्या. आता या बैठकीतून मंत्र्यांना खातेवाटप देण्याची माहिती मिळाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी आज खाते वाटप जाहीर केले आहे. शिंदे यांना सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान,परिवहन, माहिती व जण संपर्क, पर्यावरणव वातावरणीय बदल, सामाजिक न्याय, खनिकर्म, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांकडे नसलेले खाते असणार. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जल संपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार हे खाते असणार. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त व नियोजन खातं मिळाले आहे.  

छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं दिले आहे. 
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील यांना  सहकार खातं देण्यात आलं आहे. 
 राधाकृष्ण विखे-पाटील  यांना  महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास खातं देण्यात आलं आहे. 
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार यांना वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय हे खातं देण्यात आलं आहे. 
हसन मियाँलाल मुश्रीफ यांच्या कडे  वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य खातं असणार.  
चंद्रकांतदादा बच्चू पाटील यांना  उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यचे खाते देण्यात आले. 
विजयकुमार कृष्णराव गावित यांना आदिवासी विकास खाते मिळाले आहे. 
 गिरीष दत्तात्रय महाजन यांच्या कडे ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन खाते मिळाले आहे. 
 गुलाबराव पाटील यांच्या कडे पाणीपुरवठा व स्वच्छता खातं देण्यात आले आहे. 
 दादाजी दगडू भुसे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)खाते देण्यात आले आहे. 
संजय दुलिचंद राठोड यांना मृद व जलसंधारण खाते देण्यात आले आहे. 
धनंजय पंडितराव मुंडे यांना कृषि विभागाचे खाते मिळाले आहे. 
सुरेशभाऊ दगडू खाडे यांना कामगार खातं मिळालं आहे. 
संदीपान आसाराम भुमरे यांच्या कडे  रोजगार हमी योजना व फलोत्पादन खाते देण्यात आले आहे. 
उदय रविंद्र सामंत  यांना उद्योग खाते देण्यात आले आहे. 
तानाजी जयवंत सावंत यांच्या कडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण  खाते देण्यात आले आहे. 
रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांच्या कडे  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), खाते देण्यात आले आहे. 
अब्दुल सत्तारयांच्या कडे  अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खाते देण्यात आले आहे. 
 दीपक वसंतराव केसरकर यांच्या कडे शालेय शिक्षण व मराठी भाषा  खाते देण्यात आले आहे. 
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांच्या कडे अन्न व औषध प्रशासन  खाते देण्यात आले आहे. 
अतुल मोरेश्वर सावे यांच्या कडे  गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण  खाते देण्यात आले आहे. 
 शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्या कडे  राज्य उत्पादन शुल्क  खाते देण्यात आले आहे. 
अदिती सुनिल तटकरे यांच्या कडे महिला व बालविकास  खाते देण्यात आले आहे. 
संजय बाबुराव बनसोडे यांच्या कडे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे  खाते देण्यात आले आहे. 
मंगलप्रभात लोढा यांच्या कडे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता  खाते देण्यात आले आहे. 
अनिल पाटील यांच्या कडे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन. खाते देण्यात आले आहे. 
 
 
 
 
Edited By- Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

US Open: पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन पहिल्या फेरीत सहज विजयी