Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Gram Panchayat Election : राज्यात उडणार धुरळा ग्रामपंचायत निवडणुकीचा

voting
, शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (21:18 IST)
राज्यात 5 नोव्हेंबरला एकूण 2359 ग्राम पंचायतीच्या निवडणुका होणार आहे. एकूण 2950 सदस्य निवडीसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून 2489 सरपंचांची निवड होणार आहे. तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.  सध्या गावात निवडणुकीचा धुराळा आहे. गावात चुरशीचं वातावरण निर्माण झालं आहे.   
 
ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत पक्ष नसून पॅनल असतात. लोकसभा निवडणुकीच्या आधी गावगाड्याची निवडणूक होते. यामुळे ग्राम पंचायतीचा निकालानंतर गावगाड्याच्या कल कुठं आहे हे स्पष्ट होणार. 
 
राज्यात 5 नोव्हेंबर रोजी ग्राम पंचायतीत निवडणुका होणार असून एकूण 2359 ग्राम पंचायतीत निवडणुका होणार असून 2950 सदस्यांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तर 2489 सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार होणार. 
 
राज्यात रविवारी 5 नोव्हेंबर रोजी गावागावात निवडणुकीचा धुरळा उडणार असून 33 जिल्ह्यात गावगाड्याच्या कारभारीची निवड करण्यासाठी मतदान होणार. या निवडणुकीत चुरशीची लढत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 
 

Edited by - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समुद्रात जेलिफिश उठल्याने मच्छीमारीवर दुहेरी संकट, कोलंबी उत्पादनावर मोठा परिणाम होणार?