Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Rain update:राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा

monsoon
, शनिवार, 23 जुलै 2022 (10:45 IST)
राज्याच्या काही भागात कमी पाऊस तर काही भागात अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यात आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासादायक परिणाम मिळत आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात नद्यांना पूर आलं आहे. नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.  
 
आजपासून चार दिवस मुसळधार पावासाचा इशाराहवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.  मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'गोष्ट एका पैठणीची'ला सर्वोत्कृष्ट मराठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार