Maharashtra School Summer Vacation राज्यातील उन्हाचा कडाका वाढल्याने आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ज्या शाळांचा अभ्यासक्रम सुरू आहे अशा शाळा वगळता राज्यातील बोर्डाच्या सर्व शाळांना आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील शाळा आता 15 जून पासून होणार असल्याचे सांगितले गेले आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे येथे 30 जूनपर्यंत सुट्य्या राहतील.
राज्यातील बहुतेच जिल्ह्यात पारा हा 40 च्या वर गेल्याने उष्मताघाता सारख्या घटना वाढत आहेत. अशात वाढत्या उन्हाचा मुलांना त्रास होऊ नये म्हणून आज पासून सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळी अथवा संध्याकाळी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.
राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास किंवा महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू असल्यास त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत.