Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील ९ वी आणि ११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अजून एक संधी

Maharashtra Schools
, गुरूवार, 23 जुलै 2020 (10:41 IST)
राज्यातील ९ वी आणि ११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून एक संधी देण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.
 
चालू शैक्षणिक वर्षात संधी
विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातच एक संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनावर एकमेव उपाय असल्याने शाळेत पुर्वीसारखं जाता येणार नाहीये आणि हे किती काळ सुरू राहणार याचाही अंदाज कोणाला नाहीये. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत. त्यामुळे मुलं तासनंतास मोबाईलसमोर असल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
 
नवी नियमावली
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे ऑनलाईन क्लासच्या नावावर काही शाळांनी सुरू केलेल्या मनमानीला चाप लागणार आहे. कोरोनामुळे बाहेर खेळण्यावर मुलांवर बंधनं आली आहेत. त्यात सगळाच अभ्यास ऑनलाईन असल्याने मुलं मोबाईल आणि लॅपटॉप समोर बसून राहत आहे. त्यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याविषयी पालकांना चिंता वाटत होती. त्यामुळे तज्ज्ञांच्या शिफारसीनंतर केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने हे नवे नियम जाहीर केले आहेत.
 
अशी आहे नियमावली
प्रायमरी – पालक आणि मुलांसाठी ठरवून दिलेल्या दिवशी फक्त 30 मिनिटे
१ ली ते १२ वी – सगळ्यांसाठी NCERTने अभ्यासक्रम आखून दिला आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम घेतला जावा.
१ ते ८ वी – प्रत्येक दिवशी ३०-४५ मिनिटांचे दोन सेशन्स. त्यापेक्षा जास्त नको
९ वी ते १२ – प्रत्येक दिवशी ३०-४५ मिनिटांचे चार सेशन्स.
विद्यार्थ्यांनो नापास झालात? नो वरी, सरकारने घेतलाय ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्लाझ्मा थेरपीबाबत जनतेने सावध राहण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन