Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूर ते गोवा जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधणार

devendra fadnavis
, बुधवार, 31 जानेवारी 2024 (14:41 IST)
‘महाराष्ट्र शक्तीपीठ’ महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. विदर्भाला महाराष्ट्र-गोवा सीमेवर जोडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवीपर्यंत महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे. 
 
मंगळवारी उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाबाबत आढावा बैठक घेतली. राज्य अतिथीगृह सह्याद्री येथे झालेल्या बैठकीला राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गायकवाड उपस्थित होते. उपमुख्यमंत्री म्हणाले की, सध्या नागपूर ते गोव्याला जाण्यासाठी 21 तास लागतात. मात्र महाराष्ट्र शक्तीपीठाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते गोवा हा प्रवास 11 तासांत पूर्ण करता येणार आहे. 
 
या महामार्ग प्रकल्पासाठी 9385 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. या भूसंपादनासाठी 86 हजार 300 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असेल.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे. यामुळे या जिल्ह्यांतील धार्मिक स्थळे आणि पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. 
 
या महामार्गाद्वारे राज्यातील तीन शक्तीपीठे, दोन ज्योतिर्लिंगे, दत्तगुरूंची पाच धार्मिक स्थळे आणि पंढरपूर मंदिरासह एकूण 19 तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे, औंढा नागनाथ आणि परळी-वैजनाथ आणि इतर धार्मिक स्थळेही जोडली जातील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रियकराने आयटी इंजिनीअर प्रेयसीवर झाडल्या 5 गोळ्या, 10 वर्षांपासून होतं प्रेम प्रसंग