Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाविकास आघाडी ही कडू गोळी, पण..... :पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chauhan
, शुक्रवार, 3 जून 2022 (21:15 IST)
महाविकास आघाडी ही कडू गोळी आहे. पण भाजपला हटवायचे असेल तर ही कडू गोळी घ्यावी लागेल याची कल्पना होती म्हणून एकत्र आलो, असं विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी केलं आहे. दोन पक्षाचे सरकार चालवणे ही तारेवरची कसरत आहे. पण तीन पक्षाचं सरकार स्थापन करण्याचा पहिल्यांदा हा प्रयोग झाल्याने अडचणी होतातच, असंही त्यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. 
 
यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवरही भाष्य केलं. याबाबत कोर्टात लढाई लढू. एखाद्या व्यक्तीने चुकीचे काम केले असेल तर नक्की खटला चालवा. पण तुम्हाला ते करायचं नाही. तुम्हाला फक्त मानहानी करायची आहे. आरोप सिद्ध करा ना? असं आव्हानच चव्हाण यांनी भाजपला दिलं. यावेळी त्यानी संघावरही भाष्य केलं. मोदी आज संघाचे काही ऐकतात का? त्यांचे काही चालतं असं मला वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
 
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची निवडणूकीबाबत बोलतांना ते म्हणाले की,  यासंदर्भात आम्ही पत्र लिहिले होते. त्याबाबत १२ डिसेंबर २०२० ला सोनिया गांधी यांनी आम्हाला चर्चेला बोलावले होते. पाच तास चर्चा झाली. त्यात पक्षाला पुर्णवेळा अध्यक्ष हवा, चिंतन शिबिर व्हावे व पक्षाच्या अध्यक्षांची निवडणूक व्हावी या मागण्या होत्या. यातील दोन मागण्यांवर काम झाले आहे. श्रीमती गांधी सध्या पुर्णवेळा काम करीत आहेत. निवडणुकांची तयारी सुरू असून लवकरच पक्षाच्या अध्यक्षांची निवड होईल. ते काँग्रेसचे निर्वाचीत नेतृत्व असेल. ते नेतृत्व २०२४ च्या निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी चर्चेची प्रक्रीया सुरु करेल.
 
मुकुल वासनिक यांना परत महाराष्ट्रातून आणलं तर बरं होईल असं मला देखील वाटलं. मी नाराज आहे असं काही नाही. पण महाराष्ट्रासाठी आनंदी वातावरण होईल असं माझं मत होतं. मी नाराज अजिबात नाही. ही चर्चा संपलेली आहे, असं त्यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कांद्याला बाजार हस्तक्षेप योजनेत समाविष्ट करा, भारती पवार यांनी केली शिफारस