लंडन- भारतीय वंशाच्या महिलेने प्रथमच गर्भात सतत निगराणी करण्यात आलेल्या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. डॉक्टरांनी डिजिटल मॉनिटरमार्फत 9 महिने त्यांच्यावर लक्ष ठेवले. जुळ्या मुलांना जन्माच्या वेळी जास्त धोका असतो, त्यामुळे दोन्ही गर्भात समान विकास होतो की नाही, हे पाहण्याचा हेतू त्यामागे होता. डॉक्टरांनी त्यांना 10 हजारपेक्षा जास्त वेळा गर्भात स्कॅन केले. दोघांचा ग्रोथ चार्टही बनवला.
एका वृत्तानुसार, माला धुरी यांनी लंडनच्या सेंट जॉर्ज रूग्णालयात कियान आणि कुश नावाच्या दोन सदृढ मुलांना जन्म दिला. कियानचे वजन 2 किलो आणि कुशचे वजन दोन किलो 100 ग्रॅम आहे.