Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोकड दूध देतो....!

बोकड दूध देतो....!
गाई-म्हशी शेळी दूध देतात, हे तुम्हा- आम्हाला माहीत आहे. मात्र, बोकड दूध देतो, असे म्हटले तर? ऐकून आश्चार्याचा धक्का बसेल, पण हे खरे आहे. गोंदियातील एक बोकड चक्क दूध देतो. गोरेगाव तालुक्यामधील पिपरटोला गावातील कटरे कुटुंबीय हे गेल्या 50 वर्षांपासून शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत.
 
कटरे कुटुंबाकडे सध्या 40 हून अधिक दुभत्या बकर्‍या, शेळ्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी पिपरटोला गावात मेंढी पालन करणारे लोक आले होते. उच्च दर्जाच्या शेळ्या उत्पादित करण्यासाठी त्यांच्याकडून कटरे कुटुंबीयानी तोतापुरी प्रजातीचा बोकड खरेदी केला. इतर बकर्‍यांप्रमाणे बोकडाला देखील आंघोळ घालून उन्हात उभे केले असता, बकर्‍याच्या स्तनातून दूध टपकायला लागले. पहिल्या दिवशी या अजुबा नावाच्या बोकडाने 150 मिली दूध दिले. दूध देणार्‍या अजुबा बोकडाविषयी गोरगावच्या पशुवैद्यकीय अधिकर्‍यांना माहिती देण्यात आली.
 
डॉक्टरांनी बोकडाची वैद्यकीय तपासणी केली असता, बोकडाला गानोकोमोसटिया नावाचा आजार झाला असल्याने आणि बोकडाच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्याने बोकड दूध देत असल्याचे डॉक्यरांचे म्हणणे आहे. 25 हजार रूपयांना खरेदी केलेल्या या बोकडाला आज दीड लाख रूपयांपर्यंतची मागणी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेयमारची बार्सिलोनामधून विदाई