Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालेगाव – सोयगावात यु-ट्यूब ने घडवले ग्रामीण भागातील रोलर स्केटर्स, यु-ट्यूब झाले गुरू द्रोणाचार्य

मालेगाव – सोयगावात यु-ट्यूब ने घडवले ग्रामीण भागातील रोलर स्केटर्स, यु-ट्यूब झाले गुरू द्रोणाचार्य
, सोमवार, 24 मे 2021 (16:14 IST)
जरी एकलव्याला गुरू द्रोणाचार्य यांचे प्रत्यक्ष धनुर्विद्या प्रशिक्षण मिळाले नाही तरी त्याने गुरू द्रोणाचार्य पांडवांना शिकवताना पाहून स्वतः सराव केला व तरबेज धनुर्धर झाला. त्याच प्रमाणे सोयगावतील मुलांना स्केटिंग शिकण्याची इच्छा निर्माण झाली. लॉकडाऊन असल्याने प्रशिक्षण केंद्र बंद, घरी किंवा आजूबाजूला कोणी शिकवणारे नाही. मग आता करायचे काय ? मग अश्यातच त्यांना गुरू यु-ट्यूब बाबाची आठवण झाली. मग यु-ट्यूब प्रशिक्षण व्हिडिओ शोधण्यास सुरुवात झाली. भरपूर स्केटिंग व्हिडिओ बघितले,अशातच स्केटिंग शिकण्याची इच्छा अधिक प्रबळ होत गेली. मग घरी आई वडिलांची मनधरणी करून रोलर स्केट मिळवले आणि चालू झाला सराव…
कोणीही तज्ञ प्रशिक्षक नाही,फक्त जे बघितलं त्यावरून पडत झडत सराव सुरू,दररोज स्केटिंग संबंधित व्हिडिओ बघायचा ,घरी सराव करायचा,अश्यातच आत्मविश्वास वाढल्याने मुले रस्त्यावर उतरले. आज या मुलांचा ग्रुप सकाळी व सायंकाळी दोन दोन तास सराव करतात त्यात स्केट रेस, स्पीड ब्रेकर जंप, जागेवर वळणे, गोल गोल फिरणे. त्यांचा आत्मविश्वास इतका वाढीस लागला की ते सरावा दरम्यान कोणत्याही हेल्मेट अथवा नि-कॅप उपयोग  करत नाहीत .यासाठी त्यांनी रोलर स्केटचा उपयोग केला.रोलर स्केट म्हणजे बुटाला मागे पुढे दोन-दोन असे चार चाक असतात.त्यामुळे शारीरिक समतोल व वेग यांचा योग्य मेळ बसतो.अतिशय चपळ व जलद,कौशल्यपूर्ण स्केटिंग बघून गावातील नागरिक स्तब्ध झालेत,सर्व स्तरातून या मुलांचे कौतुक होत आहे. पालक सातत्याने तक्रार करतात की मुले दिवसभर मोबाईल वर गेम खेळतात,प्रत्यक्ष मैदानी खेळ खेळत नाहीत.पण या  मुलांच्या ग्रुपने हा समज मोडीत काढला की मुले मोबाइल चा उपयोग विविध खेळ व अभ्यास शिकण्यासाठी ही करतात.स्केटिंग चे विविध शारीरिक व मानसिक फायदे आहेत.शरीराची लवचिकता वाढवणारा हा खेळ आहे.यामध्ये मान, हात, पाय लवचिक होतात.पाठीचा कणा मजबुत होतो,पोटाचा व पाठीचा व्यायाम होतो तसेच आत्मविश्वास वाढीस लागतो.
– खुशी बच्छाव -बालवाडी–  माऊ बच्छाव- इयत्ता 2री– स्मित बच्छाव- ४ थी– साई कोठावदे- ५ वी– अजित बच्छाव- ५ वी– दिक्षा सूर्यवंशी-५ वी– खुशी बच्छाव-५ वी– गणेश बच्छाव-८ वी– सत्यम अहिरे-८ वी– दुर्गेश बच्छाव-९ वी– स्वप्निल अहिरे-९ वी– साई बच्छाव-७ वी– धनश्री बच्छाव- ६ वी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अदार पुनावाला: वेगाचा चाहता सर्वांना वेगानं लस पुरवू शकेल का?