Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालेगाव दगडफेक प्रकरण; तिघे संशयीत ताब्यात, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार

मालेगाव दगडफेक प्रकरण; तिघे संशयीत ताब्यात, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार
, शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:13 IST)
मालेगाव :- त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबराबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अमरावती, मालेगाव, भिवंडीत आणि नांदेडमध्ये प्रचंड मोर्चे काढण्यात आले. काही जिल्हयात तर या मोर्चाला गालबोट ही लागले. मालेगावमध्ये दगडफेक प्रकरणात तिघे संशयीत ताब्यात घेतले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी सांगितले आहे.
 
त्रिपुरा येथील घटनेचा निषेध म्हणून मालेगाव बंदची हाक दिल्यानंतर या बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले.जमावाने केलेल्या दगडफेकीत अप्पर पोलीस अधिक्षकांसह ३ पोलीस अधिकारी व ७ कर्मचाऱ्यांसह काही नागरिक जखमी झाले आहेत.या घटनेतील सिसिटीव्ही फुटेज तपासून जमावातील दोषींवर व कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
घटनेच्या तपासासाठी ६ पथके तयार करण्यात आली आहे.आतापर्यंत तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचेही बी.जी.शेखर यांनी सांगितले.कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित कशी राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कब्रस्तानात प्रेमीयुगुलाचं सुरू होतं ‘गुलूगुलू’, पुढं झालं असं काही…