Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

मनमाड :मध्य रेल्वे "या" 156 उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

indian railway
, रविवार, 31 मार्च 2024 (10:19 IST)
मनमाड :  आगामी सण उत्सव आणि लागणाऱ्या उन्हाळ्यात सुट्टी निमित्त प्रवासी रेल्वे गाडीला होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने १५६ उन्हाळी विशेष प्रवासी रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे प्रवाशांना प्रवास करताना आरक्षित तिकीट मिळेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे.
 
विशेष प्रवासी रेल्वे गाड्यांचा तपशील पुढील प्रमाणे :
 
लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)
गाडी क्रं.०१०५३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ३ एप्रिल ते २६ जून पर्यंत (१३ फेर्‍या) दर बुधवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता बनारस येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रं.०१०५४  साप्ताहिक विशेष गाडी दि. ०४ एप्रिल ते दि. २७ जून पर्यंत (१३ फेर्‍या) दर गुरुवारी बनारस येथून रात्री २०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री२३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, जेनाथपूर आणि वाराणसी स्थानकात येताना व जाताना थांबा असून एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ३ सेकंड सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी सरचना आहे.
 
 लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष (५२ फेऱ्या)
गाडी क्रं.०१४०९ द्वि-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०१ एप्रिल ते दि. २९ जून पर्यंत (२६ फेऱ्या) दर सोमवार आणि शनिवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १७.०० वाजता दानापूर येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रं.०१४१० द्वि-साप्ताहिक विशेष दानापूर दि. ०२ एप्रिल ते दि. ३० पर्यंत (२६ फेऱ्या) दर मंगळवार आणि रविवारी रात्री १८.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्थानकात येताना व जाताना थांबा असून एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, ३ सेकंड सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी या गाडीची संरचना आहे.
 
लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)*
गाडी क्रं.०१०४३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०४ एप्रिल ते दि. २७ जून पर्यंत (१३ फेऱ्या) दर गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २१.१५ वाजता समस्तीपूर येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रं.०१०४४ साप्ताहिक विशेष समस्तीपूर दि. ०५ एप्रिल ते दि. २८ जून पर्यंत (१३फेऱ्या) दर शुक्रवारी २३.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर स्थानकात थांबा असून एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, ३ सेकंड सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी या गाडीची संरचना आहे.
 
लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)*
गाडी क्रं.०१०४५  वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०९ एप्रिल ते दि. ०२ जुलै (१३ फेर्‍या) दर मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रं.०१०४६ वातानुकूलित साप्ताहिक विशेष प्रयागराज येथून दि. १० एप्रिल ते दि. ०३ जुलै (१३ फेऱ्या) दर बुधवारी सायंकाळी १८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर या रेल्वे स्थानकात येताना व जाताना थांबा असून एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, तीन वातानुकूलित- द्वितीय, १५ वातानुकूलित- तृतीय, १ हॉट बुफे कार आणि १ जनरेटर कार अशी या गाडीची संरचना आहे.
 
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)
गाडी क्रं.०११२३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०५ एप्रिल ते दि. २८ जून पर्यंत (१३ फेर्‍या) दर शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १८.५५ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०११२४ साप्ताहिक विशेष गोरखपूर दि. ०६ एप्रिल ते दि. २९ जून पर्यंत (१३ फेऱ्या) दर शनिवारी रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ०७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती या स्थानकात येताना जाताना थांबा असून दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, ३ दुसरी सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी या गाडीची संरचना आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा समाजाच्या बैठकीत राडा; परिसरात तणावाची स्थिती! नेमकं काय झालं?