Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनमाड रेल्वे स्थानकावरील 'त्या' पोलिस कॉन्स्टेबलचे निलंबन

मनमाड रेल्वे स्थानकावरील 'त्या'  पोलिस कॉन्स्टेबलचे  निलंबन
नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकात भिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल जयकुमार तायडेंना निलंबित करण्यात आले आहे. मागच्याच आठवड्यात मनमाड रेल्वे स्टेशनवर एका भिकाऱ्याला त्याने बेदम मारहाण करण्यात आली होती.

मनमाड रेल्वे स्टेशनमध्ये झोपलेल्या भिकाऱ्याला तिथे झोपल्याच्या कारणावरुन मारहाण करण्यात आली होती.  त्याला वाईट शिव्याही घालण्यात आल्या होत्या. मनमाड रेल्वे स्टेशनमध्ये हा भिकारी झोपला होता. रात्री उशिरा त्याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या सर्व मारहाणीचे  मोबाईलमध्ये शुटिंगचा  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला व अपंग संशोधकांना प्रबंध सादर करण्यास मुदतवाढ