नाशिक मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कारडा कन्स्ट्रक्शनचे चे संचालक मनोहर जगूमल कारडा यांनी आज देवळाली यार्ड संसरी रेल्वे गेट जवळ मालगाडी समोर येऊन आत्महत्या केली.
कारडा कन्स्ट्रक्शनचे मुख्य संचालक नरेश कारडा यांचे ते बंधू होते. मुबंई नाका पोलीस ठाण्यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकारणी नरेश कारडा हे पोलीस कोठडीत असून मनोहर कारडा व इतर संशयित पोलिसांना पाहिजे होते. आर्थिक फसवणूक झाल्या बाबत त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज दुपार च्या सुमारास मनोहर कारडा यांनी पोल की मी क्र 182/10 ते 182/12 देवळाली यार्ड, संसरी गेट जवळ मुबंई कडे जाणाऱ्या मालगाडी समोर येऊन आत्महत्या केली. आत्महत्या आर्थिक विवेचन, पोलिसांची भीती की अन्य काही कारण आहे याचा लोहमार्ग पोलीस तपास करीत आहे.
अधिक तपास लोहमार्ग ठाण्याचे प्रभारी निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली महिला पोलीस हवालदार जयश्री साळवे करीत आहे.