Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या धक्क्यांमुळे सख्या भावांचा मृत्यु

Death
कोल्हापूरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून खेकडे धरायला गेलेल्या दोन सख्या भावांच्या विजेचा शॉक बसून मृत्यु झाला, जंगली डूक्कर मारण्यासाठी लावलेल्या या विजेच्या सापळ्यात अडकल्याने दोघे भाऊ जाग्यावरच गतप्राण झाले. त्यानंतर सापळा लावणाऱ्या इसमांच्या हि गोष्ट लक्षात आल्य़ावर त्यांनी हि घटना लपवण्यासाठी दोघांचे मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे. साधारणत दोन दिवसांनी या घटनेचा छडा लावण्यात आला.
 
पन्हाळा तालुक्यातील राक्षी या गावात राहणारे जोतीराम कुंभार आणि नायकु कुंभार या दोन भावांच्या मृत्युने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. अधिक माहीती नुसार, जोतीराम आणि नायकु कुंभार हे सख्खे भाऊ बुधवारी रात्री धरणाचा ओढा परिसरात खेकडे पकडण्य़ासाठी गेले होते. पण दोन दिवस ते घरी परतले नाही. गावातील लोकांनी या दोघांचा शोध घेतला तरी ते सापडले नसल्याने त्यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली.
 
पोलीसांनी आपला तपास सुरु करताना अनेक बाबी तपासल्या. त्यामध्ये त्यांना धरणाकडील ओढ्याजवळ जंगली डूक्करांसाठी जिवंत विजेचा सापळा लावल्याची बातमी कळाली त्या अनुषंगाने तपास केला असता. त्यांच्या मृत्युचे सत्त्य समोर आले.
 
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, जोतीराम कुंभार आणि नाायकु कुंभार हे बुधवारी रात्री खेकडे धऱण्यासाठी धरणाकडील ओढा या परिसरात गेले होते. पण त्या ठिकाणी अगोदरच गावातील मंडळींनी डुकरांना मारण्यासाठी जिवंत विजेचा सापळा लावला होता. यासापळ्यात अडकल्य़ाने दोघांचाही यामध्ये दुर्देवी मृत्यु झाला. हि बाब सापळा लावणाऱ्यांच्या लक्षात आल्यावर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ते जंगलात फेकून देण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे पन्हाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सख्या भावाकडून भावाचा खून! पैशाच्या वादातून कृत्य