Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना व्हॅक्सिनमुळे अनेकांना हृदयविकाराचा त्रास,प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

praniti shinde
, रविवार, 17 मार्च 2024 (12:20 IST)
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात भेट करत असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकांशी संवाद साधला आणि त्यांनी  खळबळजनक आरोप केले आहे. त्या म्हणाल्या की कोव्हीड वॅक्सीन घेतल्यामुळे काहींना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला. त्यांनी इलेक्टरोल  बॉण्डच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका करताना कोव्हीड वॅक्सीन संदर्भात खळबळजनक विधान केलं. त्या म्हणाल्या सरकारने वॅक्सीन खरेदी केले होते त्यामुळे त्यांनी लोकांना लस लावण्यासाठी जबरदस्ती केली. शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यात विविध गावांना भेट देत त्यांनी लोकांशी संवाद साधला. इलेक्टरोल बॉण्ड चा खुलासा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने काल स्टेटबॅंकेला सांगितलं. या मध्ये भाजपला  ज्या कंपन्यांना मोदी सरकार ने टेंडर दिले त्यांनी पैसे दिल्याचे समोर आले.  

मोदी सरकार ने सिरम कंपनीची कोव्हीड वॅक्सीन लोकांना जबरदस्ती दिली. त्या कंपनीने देखील 100 कोटी रुपये भाजपला दिल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या.हे वॅक्सीन घेतल्यामुळे अनेकांना काही न काही शारीरिक त्रास सुरु झाले. मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकारासारखे त्रास अनेकांना सुरु झाले. मी तर वॅक्सीन घेतले नाही. आपला देश हा असा एकमेव देश आहे ज्याच्या वॅक्सीनवरसर्टिफिकेट वर मोदींचा फोटो आहे. कोरोना काळात लस बनवणाऱ्या संस्थांनी 100 कोटी रुपये मोदींच्या पक्षाला दिले आहे.कोरोना वॅक्सीन मुळे लोकांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला असा खळबळजनक आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.  
Edited By- Priya Dixit 
 
Praniti Shinde on Corona Vaccine 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

US: फिलाडेल्फियामध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू, आरोपी ताब्यात