Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा क्रांती मोर्चा : 10 तारखेला महाराष्ट्र बंद नाही, अफवा पसरवणाऱ्याला अटक

मराठा क्रांती मोर्चा : 10 तारखेला महाराष्ट्र बंद नाही, अफवा पसरवणाऱ्याला अटक
, मंगळवार, 9 जानेवारी 2018 (11:01 IST)
महाराष्ट्रा साठी महत्वाची बातमी आहे. कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसरात झालेल्या दुर्दैवी प्रकारानंतर सामाजिक वातावरण बिघडले. त्यात  आता हे  वातावरण निवळत होते आणि सलोख्याचे वातावरण तयार होत असतानाच काही विघ्नसंतोषी लोकांनी सोशल मीडियावर 10 जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ आहे असे मेसेज करत ती पोस्ट सर्वत्र  फिरवले होते. मात्र  त्यात काहीही तथ्य नसून महाराष्ट्र बंद राहणार नाही, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, प्रवीण गायकवाड, तुषार काकडे यांनी दिली आहे. उलट त्या दुर्दैवी घटनेचा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध नोंदवला असून  नुकसानग्रस्त बांधवांना भरपाई देण्याची मागणी त्यांनी  केली आहे. दंगलीमधील मृत तरुण राहुल फटांगडे याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वनही केले आहे. त्याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये मिळण्याची मागणी केली आहे.  प्रशासकीय पातळीवर या संधर्भात  कार्यवाही सुरू आहे. असे असतानाही समाजात गैरसमज पसरवण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्याच्या हेतूने हे प्रसिद्धिपत्रक काढल्याचे कुंजीर यांनी म्हटले आहे.दरम्यान, 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद करण्यात आल्याची पोस्ट फेसबुकवर टाकणार्‍याविरुध्द गुन्‍हा दाखल करण्यात आला असून सोलापूरमधून विशाल प्रकाश सातपुते या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी असे आवाहन केले आहे की कोणत्याही अफवेला बळी पडू नका कोणी अफवा पसरवली तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्मचारी पेन्शन योजना ९५च्या अंतर्गत निवृत्तीधारकांची पेंशन वाढणार