नाशिकमध्ये 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे संमेलन येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी होईल.
या संमलेनामध्ये प्रसिद्धी कवी आणि गितकार जावेद अख्तर तसेच गुलजार यांना सहभागी करुन घेण्याचा विचार सुरू आहे. पण ब्राह्मण महासंघाने या गोष्टीला विरोध दर्शवला आहे.
जावेद अख्तर आणि गुलजार यांचे मराठी साहित्यसृष्टीत काय योगदान आहे? वीर सावरकरांच्या भूमीत अख्तर, गुलजार कशासाठी? असे प्रश्न महासंघाने उपस्थित केले आहेत. या संमेलनामध्ये गुलजार आणि अख्तर यांच्या नावांचा समावेश करण्याला आमचा विरोध राहील, असं ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी स्पष्ट केलं.