Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नात जेवताय सावधान अनेकांना विषबाधा

लग्नात जेवताय सावधान अनेकांना विषबाधा
, शनिवार, 12 मे 2018 (15:02 IST)
सध्या लग्नाच्या तिथी जोरात आहेत. अनेक ठिकाणी मंगलकार्यालये गर्दीने भरून गेली असून, अनेक ठिकाणी लग्न होत आहेत. मात्र जेवण करतांना सावधानता बाळगली पाहिजे, कारण सांगली येथील तासगाव भागातील लग्न समारंभात केलेल्या जेवणातून 100 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत  तासगाव येथील एका मंगल कार्यालयात दोन दिवसांपूर्वी आरवडे आणि येळावी कुटुंबीयांचा लग्नसोहळा पार पडला होता. त्यामध्ये ही घटना घडली आहे.  या लग्नात जेवण केल्यानंतर काहींना उलटी आणि जुलाबाचा प्रचंड  त्रास झाला, त्यामुळे काही लोकांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर काहींना प्राथमिक आरोग्य केंद्र आरवडे येथे दाखल करण्यात आल आहे. वैद्यकीय अधिकारी कमी पडू लागल्याने मांजर्डे, डोर्ली आणि गौरगाव येथून वैद्यकीय मदत मागवण्यात आली असून आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे. लग्नात जेवणाबरोबरच मठ्ठा देण्यात आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांनी मठ्ठा मोठ्या प्रमाणात प्यायला होता. पण मठ्ठा बनवल्यानंतर तो बनवण्यासाठी वापरलेलं पाणी आणि त्यात टाकला गेलेला बर्फ हा दूषित असल्यामुळेच हा प्रकार झाला असवा, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. त्यामुळे जेवण करताय तर लक्ष द्या, उगीच मिळतय म्हणून, फुकट कितीही खाऊ नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना