Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हुंड्यामुळे विवाहितेची आत्महत्या

हुंड्यामुळे विवाहितेची आत्महत्या
उस्मानाबाद , शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:17 IST)
उस्मानाबादेत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तुळजापूर शहरातील प्रिया घोडके नावाच्या महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
 
हुंड्यासाठी राहिलेले 1 लाख 60 हजार न दिल्याने सासरची मंडळी प्रियाला त्रास द्यायचे. तिला मारहाण करायचे, अशी माहिती आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 306, 34 नुसार नवरा, सासू , सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला फुटबॉल संघ सामन्यात दोनदा आघाडीवर असूनही पराभूत