काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फेमिली कोर्टाच्या आवारात एका विवाहित महिलेवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेने दोघांविरुद्ध 5 डिसेंबर 2025 रोजी ठाणे नगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून तिने सोशल मीडियावर जाहिरात बघून आरोपींशी संपर्क साधला. आरोपींनी तिला ठाण्यात बोलावले आणि चांगले काम देण्याचं आमिष दाखवत तिला विश्वासात घेतले. नंतर त्यांनी महिलेला एका स्पा सेंटर मध्ये काम मिळवून दिले.
घटनेच्या दिवशी 25 ऑगस्ट 2025 रोजी एका आरोपीने रात्री 8 :30 वाजेच्या सुमारास स्पा सेंटर मध्ये जाऊन महिलेकडून मसाज करून घेतला नंतर माझा वाढदिवस आहे असे सांगून महिलेला आपल्या कार मध्ये बोलावले. तिला घेऊन त्याने कार ठाणे फेमिली कोर्टाच्या आवारात नेली. आरोपीने तिथे कार थांबवली आणि केक कापला. आरोपीने केक मध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. केक खाऊन महिला बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेतच महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. तिचे अश्लील व्हिडीओ काढले नंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास महिलेला रस्त्यावर एकटे सोडून पळून गेले.
महिलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत तिला कोणालाही सांगायचं नाही गप्प राहायला सांगितले.
व्हिडीओ व्हायरल होऊन बदनामी होईल या भीतीने महिला गप्प बसली. नंतर आरोपी तिला ब्लॅकमेल करू लागले. तिने कंटाळून 5 डिसेंबर 2025 रोजी तिने आपल्या मैत्रिणीला आणि ओळखीच्या वकिलाला घडलेलं सर्व सांगितलं आणि पोलीस ठाणे गाठले. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. नगर पोलिसांनी आरोपींवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.