Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मसिना हॉस्पिटलतर्फे 24x7 अँटी-डिप्रेशन हेल्पलाईनचा शुभारंभ, मोफत मार्गदर्शन

मसिना हॉस्पिटलतर्फे 24x7 अँटी-डिप्रेशन हेल्पलाईनचा शुभारंभ, मोफत मार्गदर्शन
, गुरूवार, 6 एप्रिल 2017 (14:29 IST)
अँटी-डिप्रेशन हेल्पलाईन क्रमांक "+919323618412” ज्यामुळे खासकरून विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान येणा-या ताणाचा मुकाबला करणे शक्य होईल
  
मसिना हॉस्पिटलने विद्यार्थ्यांसाठी परीक्षेदरम्यान येणाऱ्या ताणासोबत मुकाबला करण्याच्या उद्देशाने हेल्पलाईनचा शुभारंभ केला. हा उपक्रम 7 एप्रिल 2017 रोजी असलेल्या जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आला आहे. यंदाची डब्ल्यूएचओची संकल्पना ‘डिप्रेशन’ (खिन्नता) आहे.
 
विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जास्त अपेक्षांच्या ओझ्याखाली येऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होताना दिसतात. अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षेच्या दिवशी किंवा निकालाच्या दिवशी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना दिसून येतात.
 
अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ 24x7 दिवस उपलब्ध होणार असून मोफत मार्गदर्शन पुरवण्यात येईल.
 
ही सेवा आजपासून 24x7 उपलब्ध झाली आहे. याठिकाणी विभागीय सल्लागार मार्गदर्शन पुरवतील व परीक्षा कालावधीत म्हणजे एप्रिल आणि मे 2017 दरम्यान कार्यरत असतील. याकरिता “+919323618412” क्रमांकावर संपर्क साधता येईल. 
 
या हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाची मोठी ख्याती असून इथे विद्यार्थ्यांसाठी डीएनबी मनोदोषचिकित्सा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. अलीकडच्या अति-स्पर्धात्मक वातावरणात परीक्षांचा ताण डिप्रेशन (खिन्नता) ला कारणीभूत ठरतो. त्यातून आत्महत्या करण्यास खतपाणी मिळते. अशा स्थितीत पालक हे विद्यार्थ्यांसाठी आधारस्तंभ होण्यात कुठेतरी कमी पडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण अधिक वाढतो. या हेल्पलाईन सारखा एखादा पर्याय योग्य सल्ला आणि दृष्टीकोन मिळण्यासाठी उपयोगी पडतो. ज्याचा भरपूर फायदा विद्यार्थ्यांना घेता येईल.
 
याशिवाय दक्षिण मुंबईतील निवासी वसाहतींना (भायखळा, माझगाव, जे. जे. रोड, नागपाडा आणि इतर भागांचा समावेश) भेट देण्याची विभागाची योजना आहे. या उपक्रमाद्वारे कोणत्याही कारणामुळे खिन्नतेने ग्रासलेल्या व्यक्तीची तपासणी करून त्यांना योग्य उपचार पुरवले जाणार आहेत..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रशिक्षणात दोष नाही: युकी