अहमदनगरमध्ये बारावी गणित विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सकाळी 10 वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याची चर्चा रंगत आहे. शिक्षणाधिकारी श्रीगोंद्यात दाखल झाले आहेत. कुठल्या परीक्षा केंद्रावरून पेपर फुटला याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, सकाळी 10 वाजताच उत्तरपत्रिकेसह पेपर सोशल मीडियावर बघितल्यानंतर आर्श्चय व्यक्त केले जात आहे.
या काही वेळे अगोदरच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेमध्ये माहिती देत असताना सांगितले होते की, राज्यामध्ये कुठेही पेपर फुटला नाहीये. मात्र, सोशल मीडियावर तर गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह व्हायरल झालेला दिसतो आहे. मुंबईमधील साठे कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता.