Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमचाच महापौर होणार: पाटील

आमचाच महापौर होणार: पाटील
मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच महापौर होणार आहे अये मत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केल आहे. भाजप- शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. निवडणुकीपूर्वी युती तुटली होती   घरात भांडणं होत नाहीत का ? असा सवाल उपस्थित करत, चंद्रकांत पाटलांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत.

इतर कोणत्याही पक्षांनी मनात मांडे खाऊन आनंद घेऊ नये असा टोमणाही त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला लावला आहे.कितीही विघ्ने आली तरीदेखील राज्य सरकार 5 वर्ष पूर्ण करणार आहे असा ठाम विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील सर्व पुलांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून पुढील 3 वर्षात 14 हजार पुलांची दुरुस्ती करणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं असून अनेक नवीन प्रकल्प सुरु होणार यांचे सुतोवाच त्यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन पर्यटकांना चंद्रावर पाठवणार स्पेसएक्स